आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 19 जून रोजी हस्त नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभाचा दिवस असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जातील. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. व्यस्त दिवस.

वृषभ : शुभ रंग : मरून | अंक : ९
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.कामावर दांडी मारून थोडं करमणुकीस प्राधन्य

मिथुन : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी कराल.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आज एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवणे गरजेचे आहे.

सिंह : शुभ रंग : केशरी | अंक : ३
राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. आज भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

कन्या : शुभ रंग : लाल | अंक : १
मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळच जास्त होईल. आज विरोधकांना कमजोर समजू नये.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : २
पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे.

वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळींत मोठेपणा मिळेल. अनपेक्षित लाभ होतील.

धनू : शुभ रंग : भगवा| अंक : ५
आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येतील. मित्रांच्या नादी लागूच नका.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : २
कार्यक्षेत्रात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. धाडस टळा.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
भागीदारी व्यवसायात तीव्र स्वरूपाचे मतभेद होतील. देण्या-घेण्याच्या व्यवहारात पारदशर्कता ठेवा.

मीन : शुभ रंग : क्रिम| अंक : ३
आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाण-घेवाण होईल. विचार प्रगल्भ होतील.

बातम्या आणखी आहेत...