आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 2 एप्रिल रोजी रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल.

वृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. यशदायी दिवस.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
आज नोकरदार मंडळी वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी मंडळी कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालतील.

कर्क : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७
शासकिय कामे रखडतील. श्रध्दाळू गृहीणींचा देवधर्म चालूच राहील. आज देवही नवसाला नक्की पावेल.

सिंह : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळा.

कन्या : शुभ रंग : मरून| अंक : १
व्यवसायात तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करायला समर्थ असाल. जोडीदाराची भक्कम साथ राहील.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : २
दैनंदीन कामात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
आनंदी व उत्साही असा आज दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.

धनु : शुभ रंग : भगवा | अंक : ४
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून तुम्ही आज कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे गरजेचे आहे. तुमची काही गुपिते उघड होतील. कमीच बोला.

कुंभ : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचा प्रभाव पडेल. भावंडांमधे क्षुल्लक कारणाने कटुता येईल.

मीन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ३
अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान राहतील. आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील.

बातम्या आणखी आहेत...