आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 2 जानेवारी रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. शनिवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : तांबडा| अंक : ६
काही अनुकूल घटना घडतील व तुमचे मनोबल वाढेल. आज एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल.

वृषभ : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. अथक मेहनतीच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९
आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ८
आक्रमकतेने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. आज कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.

सिंह : शुभ रंग : पिस्ता|अंक : ५
आज तुम्हाला काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे हिताचे नाही.

कन्या : शुभ रंग : क्रीम|अंक : ३
आजचा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू आहे. अपुरी स्वप्ने साकार होतील.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : २
उद्योग-व्यवसायात प्रगतिरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा| अंक : ५
कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.

धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ४
कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. आज नवीन ओळखीत व्यवहार नकोत.

मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : १
एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. आज तुम्ही पत्नीस दिलेली वचनेही पाळाल.

कुंभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काबाडकष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. मित्रांमध्ये काही वैचारिक मतभेद होतील.

मीन : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser