आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • वृद्धी नावाचा शुभ योग राहील दिवसभ

शनिवार 2 मे 2020 रोजी मघा नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. 

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

  • मेष: शुभ रंग : जांभळा| अंक : ४

मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यांच्या शिस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनची चाहूल लागेल.

  • वृषभ: शुभ रंग : मरून | अंक : ५

स्थावर इस्टेटी विषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. मानसिक शांतता लाभेल व आरोग्यही उत्तम राहील. नवीन ओळखी होतील. किमती  खरेदी कराल.

  • मिथुन : शुभ रंग : अाकाशी | अंक : ३

नवीन मित्रपरीवार वाढेल. नव्या ओळखी भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सतर्क रहा. 

  • कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५

विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. लेखक व कवींच्या लिखाणास प्रसिध्दी मिळेल. आशादायी दिवस. 

  • सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४

अत्यंत उत्साहवर्धक दिवस. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठ तुमच्या गुणांची दखल घेतील. वढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात खोेळंबा होईल.

  • कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २

महत्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. हाती असलेले पैसे जपून वापरा. आनंदाच्या भरात कुणाला वचने देऊ नका. 

                   

  • तूळ : शुभ रंग : निळा| अंक : ६

मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दूरावलेले नातलग जवळ येतील. आज पैसा पुरेसा असल्याने मनासारखा खर्च करता येतील. आज आनंदी दिवस.

  • वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : ९

आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठीकाणी काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने पार वाडावे लागतील. दिवस कटकटींचा.

      

  • धनू : शुभ रंग : पिवळा | अंक : ८

उच्चशिक्षितांना परदेशगमनाच्या संधी दृष्टीक्षेपात येतील.महत्वाचे निर्णय घेताना मात्र द्विधा मनस्थिती होईल. भक्तीमार्गात असलेल्यांना सदगुरू कृपेचा लाभ होईल.

  • मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५

कार्यक्षेत्रात  काही  मनाविरूध्द घटना घडण्याची शक्यता आहे. अशावेळी मानसिक संतूलन ढळू न देणे गरजेचे कामगार वर्गाने सुरक्षेस प्राधान्य द्यावे.

  • कुंभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : १

व्यावसायात महत्वाचे करार मदार यशस्वी होतील.आपले मत इतरांना पटवून देऊ शकाल. वैवाहिक  जिवनात एकमत असून कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम.

  • मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

नोकरीच्या ठीकाणी प्रामाणिकमणे काम कराल. काही जुन्या चुकाही निस्तराव्या लागणार आहेत. एखादा महत्वाचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.

बातम्या आणखी आहेत...