आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 20 फेब्रुवारी रोजी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या लोकांना वाद आणि व्यर्थ खरचला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
पूर्वीच्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. गृहलक्ष्मी प्रसन्न असेल.

वृषभ : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
घराबाहेर लहरी स्वभावावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अति स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. आज कामापुरतेच बोला.

मिथुन : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवाद टाळा.हौशी मंडळी जिवाची मुंबई करणार आहेत.

कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठ्या लोकांमधील संबंध व्यवसायवृद्धीच्या कामी येतील.

सिंह : शुभ रंग : लाल|अंक : २
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. सडेतोड बोलण्यामुळे हितसंबंधात कटुता येईल.

कन्या : शुभ रंग : पिस्ता|अंक : ५
आज घरातील वडीलधारी मंडळी हट्टीपणाने वगतील. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी|अंक : ७
व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.वैवाहिक जीवनात ‘तू तिथे मी’ असे वातावरण असेल.

धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ९
कामधंद्यातील काही अनपेक्षित अडचणी मानसिक स्वास्थ्य बिघडवतील. आज एकांत हवासा वाटेल.

मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : ३
महत्त्वपूर्ण चर्चेत ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको. अतिहुशार माणसे संपर्कात येतील.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : १
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. अति व्यग्र दिवस.

मीन : शुभ रंग : तांबडा| अंक : ५
काही महत्त्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होण्याची शक्यता आहे. आज विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल.

बातम्या आणखी आहेत...