आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 20 मार्च रोजी रोहिणी नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : निळा| अंक : १
मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकललेत तर बरे होईल. विश्वासातील माणसाकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
आपल्या कुवतीबाहेर जबाबदाऱ्या स्वीकारू नका. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.काही लाेक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील.

मिथुन : शुभ रंग : केशरी| अंक : ४
व्यावसायिक अडचणींवर जिद्दीने मात कराल. इतरांनी दिलेल्या अश्वासनांवर विसंबून राहू नका. आज दिवस खर्चाचा आहे, बचतीचा विचारच नको.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : २
कौटुंबिक सदस्यांत सामंजस्य राहील. विवाहाविषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

सिंह : शुभ रंग : लाल|अंक : ६
काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेसे मतभेद होऊ शकतील.

कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : ५
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अाध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

तूळ : शुभ रंग : क्रीम| अंक : ७
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ताकही फुंकून प्या.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. अनेक किचकट कामे मार्गी लागतील. मित्रांनी केलेली खोटी स्तुती आवडेल.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ८
नोकरदार मंडळी वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. आज अति आत्मविश्वास नुकसानीस कारणीभूत होईल.

मकर : शुभ रंग : जांभळा|अंक : २
उंची राहणीमानाकडे तुमचा कल असेल. विलासी वृत्ती बळावेल. प्रेमप्रकरणांना घरून होकार मिळेल.

कुंभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
कौटुंबिक जीवन समाधानी असेल. तुम्हाला घराबाहेरही आज आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवता येईल.

मीन : शुभ रंग : चंदेरी| अंक : ९
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. दुरावलेली भावंडे एकत्र येतील.

बातम्या आणखी आहेत...