आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 22 मे रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे वज्र नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : क्रिम | अंक : ७
मौजमजेस प्राधान्य द्याल. चंगळवादी वृत्ती राहील. आज तुम्ही काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल.

वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : २
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
व्यवसायात जाहीरातबाजी वाढवावी लागेल. काही तत्व गुंडाळून ठेवावी लागतील. डोके शांत ठेवण्याची गरज

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
आज रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देऊनच कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व टिकवून ठेवता येईल.

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ८
अति धावपळ टाळा. आज हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी.

कन्या : शुभ रंग : भगवा | अंक : ६
बचतीचा विचारच सोडून द्या. काही न टाळता येणारे खर्च उद्भवणार आहेत. दूरचे नातलग संपर्कात येतील.

तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : ३
वाहन खरेदीसाठी कर्जमंजुरी होईल. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. अाज म्हणाल ती पूर्व.

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ७
नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील.

धनु : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
नोकरीच्या ठिकाणी कामाशिवाय फार खोलात शिरू नका. अडचणी देवालाच सांगितलेल्या बऱ्या.

मकर : शुभ रंग : मरून | अंक : ४
काही गोडबोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे. कामापुरतेच बोलणे हिताचे.

कुंभ : शुभ रंग : तांबडा | अंक : २
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. वादविवादात तुमचे मत प्रभावी राहील.

मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५
फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. काही कंटाळवाणी कामे करावी लागतील.

बातम्या आणखी आहेत...