आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शनिवार 23 जानेवारी 2021 रोजी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...
मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : १
अति आक्रमकतेने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. अधिकारी वर्गाने अधिकारांचा गैरवापर टाळावा.
वृषभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
आवक पुरेशी असली तरी अनाठायी खर्चास लगाम गरजेचा राहील. आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. काही दूरचे नातलग संपर्कात येतील.
मिथुन : शुभ रंग : चंदेरी|अंक : २
अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. येणी असतील तर वसूल होतील.
कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ५
आवडत्या क्षेत्रात उत्तम नेतृत्व कराल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. वडिलांचे मन दुखावू नका.
सिंह : शुभ रंग : गुलाबी|अंक : ३
नोकरदारांनी वाट्याचे काम करावे. फार खोलात शिरू नये. वडीलधारी मंडळी फार हट्टीपणाने वागतील.
कन्या : शुभ रंग : निळा|अंक : ६
एखादी गोष्ट मनाला लावून घ्याल. विरोधक तुमच्या चुका काढतील. संयम ढळू देऊ नका.
तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
अति श्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. पत्नीच्या चुका काढू नका.
वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील.महत्त्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून राहाल.
धनू : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
कुटुंंबीयांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. प्रकृती ठणठणीत असेल.
मकर : शुभ रंग : लेमन| अंक : ५
कष्टांचाही अतिरेक करू नका. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारणे योग्य ठरणार नाही.
कुंभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
काही जणांना घरदुरुस्तीची करकोळ कामे हाती घ्यावी लागतील. वाहन दुरुस्तीसाठीही खर्च होईल.
मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : २
आज मित्रांमध्ये न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील. जोडीदाराकडेही मन मोकळे करताना हातचे राखूनच बोला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.