आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक शुभ आणि एक अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

शनिवार, 23 मे रोजी रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती अतिगंड व सुकर्मा नावाचा एक शुभ आणि एक अशुभ तयार करत आहेआहे. अतिगंड या अल्पकाळ (सकाळी 6:30 पर्यंत) असणाऱ्या अशुभ योगाच्या प्रभावाने वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतर तयार होणाऱ्या सुकर्मा योगामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. याचा शुभ/अशुभ प्रभाव 12 पैकी 7 राशींच्या व्यक्तींवर विशेष राहील. यामुळे अपूर्ण राहिलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. या व्यतिरिक्त 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३

अत्यंत उत्साहवर्धक दिवस. आज कार्यक्षेत्रात वाढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. प्रवासात खोेळंबा.

वृषभ: शुभ रंग : जांभळा | अंक : १

विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात घेतलेले निर्णय अचूक ठरतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या गुणांची दखल घेतील. अनुकूल दिवस.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४

महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. हाती असलेले पैसे जपून वापरा. आनंदाच्या भरात कुणाला वचने देऊ नका.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : २

मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दुरावलेले नातलग जवळ येतील. मनासारखा खर्च करता येईल.

सिंह : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ६

आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होण्याची शक्यता आहे. काही प्रश्न चतुराईने सोडवाल

कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ८

उच्चशिक्षितांना विदेशगमनाच्या संधी चालून येतील. भक्तिमार्गात असाल तर सद्गुरू कृपेचा लाभ होईल.

तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

आज महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल.वाहन चालवताना आपल्या सुरक्षेची काळजी घ्या.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ९

व्यावसायात महत्त्वाचे करार मदार यशस्वी होतील.वैवाहिक जीवनात एकमत राहील. आनंदी दिवस.

धनू : शुभ रंग : निळा| अंक : ७

नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकमणे काम कराल. काही जुन्या चुकाही निस्तराव्या लागणार आहेत. व्यग्र दिवस.

मकर : शुभ रंग : केशरी | अंक : ३

मुलांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्यावे लागतील. त्यांचे लाड पुरवावे लागतील. प्रकृतिस्वास्थ्य उत्तम राहील.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १

स्थावर इस्टेटीविषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. मानसिक शांतता व आरोग्यही लाभेल.

मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ५

नवीन मित्रपरिवार वाढेल. कामानिमित्त काही प्रवास होतील. महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सतर्क राहा. 

बातम्या आणखी आहेत...