आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज चंद्र आणि मंगळ समोरासमोर, या शुभ योगामुळे 6 राशीच्या लोकांना होऊ शकता धनलाभ
Advertisement
Advertisement

25 जुलै शनिवारी चंद्र आणि मंगळ समोरासमोर राहतील. याच्या प्रभावाने महालक्ष्मी योग जुळून येत आहे. यासोबतच आज श्रावण मासातील पंचमी तिथी असून नागपंचमी सण आहे. 12 पैकी 7 राशीच्या लोकांना बिझनेस आणि नोकरीत फायदा होईल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७
पारिवारिक सुखात वृद्धीच होईल. स्थावरविषयी खरेदी -विक्री फायद्यात राहील. मुलांना शिस्त लावावी लागेल.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : १
आज तुम्ही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित कराल. गृहिणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.तरुणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे घात करतील.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ५
नोकरीत बढती-बदलीच्या बातम्या येतील.ज्येष्ठ मंडळी तीर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येये साध्य होतील.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
काही दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. प्रवास सुखावह होतील.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५
व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : २
आज स्वत:चेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील.नोकरीत वरिष्ठांच्या हो ला हो करून वेळ मारून न्या.

धनू : शुभ रंग : राखाडी | अंक : ६
प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची हमखास साथ मिळेल. अाध्यात्मिक मार्गात उपासनेचे फळ मिळेल.

मकर : शुभ रंग : लाल | अंक : ४
आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.कार्यक्षेत्रात महत्त्वाचे निर्णय अनुभवींच्या सल्ल्याने घ्या.

कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक :३
आज धंद्यातील आवक-जावक सेम सेमच राहील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने सुखावतील.

मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : १
आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका.

Advertisement
0