आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 26 फेब्रुवारी रोजी मूळ नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजची ग्रहस्थिती सिद्धी नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : क्रिम| अंक : १
नोकरदारदार मंडळी आज वरीष्ठांच्या दडपणात काम करतील. नास्तीक मंडळीही देवाला हात जोडतील.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
ताकही फूंकून प्यावे असा दिवस. जास्त लाभाच्या आशेने मोठे आर्थिक धाडस करू नका. व्यस्त दिवस.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
कौटुंबिक सदस्यांमधे सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील आजचा दिवस योग्य.

कर्क : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. आज विरोधकांशी गोड बोलून स्वार्थ साधा.

सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : १
उच्चशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

कन्या : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
कौटुंबिक जिवन समाधानी असेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. आज प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : २
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश सोपे हाेईल. अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

धनु : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : १
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा गैरवापर टाळावा. घराबाहेर क्रोधावर लगाम हवा.

कुंभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
दुकनारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. छान दिवस.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या.नोकरीच्या ठीकाणी वाढीव जबाबदाऱ्या वाढतील.

बातम्या आणखी आहेत...