आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 25 जून रोजी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८
आज कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. अशावेळी मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे.

वृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : १
उच्चशिक्षितांना विदेश गमनाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता|अंक : ७
भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होणार आहे. काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने पार पाडाल.

कर्क : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९
मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दुरावलेले नातलग जवळ येतील. मनासारखा खर्च करता येईल.

सिंह : शुभ रंग : जांभळा|अंक : ४
महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. असलेले पैसे जपून वापरा.

कन्या : शुभ रंग : पांढरा|अंक : ५
ओळखी भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. इतरांचेही म्हणणे ऐकून घ्यायची तयारी ठेवा.

तूळ : शुभ रंग : भगवा | अंक : २
आज अत्यंत उत्साहवर्धक दिवस. वाढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात खोेळंबा होईल.

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ३
व्यवसायात यापूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. लेखक व कवींच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल.

धनू : शुभ रंग : राखाडी | अंक : १
मानसिक शांती लाभेल, आरोग्य उत्तम राहील. ओळखी होतील. वस्तू खरेदी कराल.

मकर : शुभ रंग : नारिंगी | अंक : ४
मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागतील.त्यांच्या शिस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवविवाहितांना बाळाच्या आगमनची चाहूल लागेल.

कुंभ : शुभ रंग : तांबडा | अंक : ९
नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकमणे काम कराल. काही जुन्या चुकाही निस्तराव्या लागणार आहेत. एखादा महत्त्वाचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे. सतर्क राहा.

मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
आपले मत इतरांना पटवून देऊ शकाल. वैवाहिक जीवनात एकमत असून कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम.

बातम्या आणखी आहेत...