आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 अशुभ योगामध्ये दिवसाची सुरुवात

शनिवार 26 सप्टेंबर रोजी, उत्तराषाढा नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे राक्षस नावाचा अशुभ योग तयार होत आहे. यासोबतच अतिगंड नावाचा योगही जुळून येत आहे. या 2 अशुभ योगामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे दिवस काही राशीच्या लोकांसाठी ठीक नाही. ग्रह-ताऱ्यांच्या अशुभ स्थितीमुळे जॉब आणि बिझनेसमध्ये 12 पैकी 7 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : क्रीम| अंक : ३
कार्यक्षेत्रात आज तुम्ही वाढीव जबाबदाऱ्या आनंदानेे स्वीकारून स्वत:चे वेगळे महत्त्व सिद्ध करू शकाल.

वृषभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे. नवीन व्यावसायिकांनी आर्थिक धाडस टाळावे. कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होईल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
आज अति आक्रमकता नुकसानीस कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ताकही फुंकून प्या.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : २
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

सिंह : शुभ रंग : गुलाबी|अंक : ८
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

कन्या : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. नवीन विषयात गोडी निर्माण होईल.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : मोतिया|अंक : ६
कौटुंबिक जीवन समाधानी असेल. तुम्ही घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. छान दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ५
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल. आज भावंडांमधे सामंजस्य राहील.

धनू : शुभ रंग : जांभळा| अंक : १
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल. दुरावलेेली नाती जवळ येतील. नेतेमंडळींचा जनमानसावर प्रभाव राहील.

मकर : शुभ रंग : चंदेरी|अंक : २
तरुणांनी मौजमजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. आवक पुरेशी असेल तरी बचतीस प्राधान्य गरजेचेे.

कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३
व्यवसायात आज स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी. कर्ज हप्ते फेडावे लागतील.

मीन : शुभ रंग : केशरी | अंक : ४
उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांत सामंजस्याची भावना राहील. विवाहेच्छुकांना योग्य प्रस्ताव येतील.