आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शनिवार 27 फेब्रुवारी रोजी मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सुकर्मा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...
मेष : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.
वृषभ : शुभ रंग : चंदेरी| अंक : १
आवक पुरेशी राहील. काही जागाविषयक प्रश्न सुटतील. प्रेमप्रकरणात मात्र नसती आफत होईल.
मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील.
कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ५
धनस्थानातील चंद्र भ्रमण आर्थिक स्थिती उत्तम ठेवेल. रखडलेल्या योजना मार्गी लागतील.
सिंह : शुभ रंग : मरून|अंक : २
आज तुमचा लहरी स्वभाव जरा काबूत ठेवण्याची गरज आहे. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही ऐकून घ्या.
कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ७
देण्या-घेण्याचे व्यवहार सतर्कतेने करणे गरजेचे. अनोळखी व्यक्तींवर अजिबात विश्वास ठेवू नका.
तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
आज सर्व दृष्टीने अनुकूल असलेला दिवस सत्कारणी लावा. मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील.
वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्या. मित्रमंडळींच्या आज फार नादी लागू नका. खास मित्रच गोत्यात आणू शकतील.
धनु : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
देवधर्म , दानधर्म इ. गोष्टींकडे तुमचा कल असेल. घरातील मोठ्यांचे अाशीर्वाद मिळवाल. प्रसन्न दिवस.
मकर : शुभ रंग : क्रिम| अंक : ८
आधी स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे गरजेचे राहील. मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.
कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६
वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.
मीन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
तरुणांनी व्ससनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. थोडा संयम ठेवा.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.