आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजची ग्रहस्थिती काही लोकांसाठी ठीक नाही कारण आज व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे

शनिवार, 27 जून रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मिथुन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ९

कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुले अज्ञाधारकपणे वागतील. प्रेमवीरांनी मात्र तू नही तो और सही हेच धोरण ठेवावे.                      

कर्क :  शुभ रंग : मरून | अंक : ७

आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.

सिंह : शुभ रंग : डाळींबी | अंक : ८

नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील.अनुकूल दिवस.

कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ४

उद्योग व्यवसायात स्पर्धा  वाढेल. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांनी साहेबांचे मूड सांभाळावेत.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २

तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. आज तुमचा ईच्छापूर्तीचा दिवस.

धनू :  शुभ रंग : भगवा | अंक : ३

नोकरीत वरीष्ठांचे दडपण जाणवेल. फक्त कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागेल. महत्वाची कामे दुपारपूर्वी उरका.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

कौटुंबिक वाद असतील तर दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : १

आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास करू नका. आज कुणालाही मोफत सल्लेवाटप नको.

मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : ८

व्यवसायात भागिदारांशी स्नेहपूर्ण संबंध असतील. जोडीदाराशी सामंजस्य राहील. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. 

बातम्या आणखी आहेत...