आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 27 मार्च रोजी पूर्वाफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. शनिवारच्या या अशुभ योगामुळे 6 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार....

मेष : शुभ रंग : क्रीम| अंक : ३
आज पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे.

वृषभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ५
आज काम कमी व धावपळच जास्त होणार आहे. कार्यक्षेत्रात विरोधकांना कमजोर समजू नका. गृहिणींना आज क्षणभरही उसंत मिळणार नाही.

मिथुन : शुभ रंग : मोतिया| अंक : २
अनपेक्षित पैसा येईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल. विरोधकांचा विरोध गोड बोलूनच थोपवून धरता येईल.कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहा.

कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक मनाजोगती असेल. मित्रांमध्ये मोठेपणा मिळेल.

सिंह : शुभ रंग : पांढरा|अंक : ९
सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबीयांना अभिमान वाटण्याजोगी अशी कामगिरी आज कराल.

कन्या : शुभ रंग : मरून|अंक : ८
कामावर दांडी मारून थोडं करमणुकीस प्राधान्य द्यावेसे वाटेल. प्रेम प्रकरणांना आज रेड सिग्नल आहे.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. संततीकडून सुवार्ता येतील.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्ण कराल.

धनू : शुभ रंग: सोनेरी|अंक: ३
आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. गृहिणी दानधर्म करतील.

मकर : शुभ रंग : आकाशी|अंक : ५
कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. आज वाद टाळावेत.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल.गृहिणींनी आज झाकली मूठ झाकलीच ठेवणे गरजेचे आहे.

मीन : शुभ रंग : चंदेरी| अंक : ४
मन काहीसे चंचल राहील. हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल. कुसंगतीने प्रतिष्ठेस धोका संभवतो.

बातम्या आणखी आहेत...