आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 28 नोव्हेंबर रोजी दिवसाची सुरुवात भरणी नक्षत्रामध्ये होत आहे. आज ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून वरियान नावाचा योग जुळून येत आहेत. या योगांच्या प्रभावातून 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस लाभ देणारा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : मरून | अंक : ३
आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

वृषभ: शुभ रंग : गुलाबी | अंक : ८
कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा. आज प्रतिकूल दिवस.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७
पारिवारीक सुखात वृध्दी होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यात राहील. मुलांना शिस्त लावायला हवी.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ९
काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. येणी असतील तर मागा, म्हणजे वसूल होतील. रूग्णांनी पथ्य सांभाळावे.

सिंह : शुभ रंग : राखाडी | अंक : ४
नोकरीच्या ठीकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील.विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश सोपे नाही.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १
आज तुम्ही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत कराल. गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.

तूळ : शुभ रंग : डाळींबी | अंक : ५
स्वत:चेच खरे करण्याकडे आज तुमचा कल राहील. आज घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आज प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

धनू : शुभ रंग : पांढरा| अंक : १
यशस्वी व्यक्तींच्या सहवासात महत्वाकांक्षा वाढतील. आप्तस्वकीय, मित्रमंडळींत तुमच्या शब्दास मान राहील.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : २
मोठेपणासाठी खर्च कराल. सडेतोड बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

कुंभ : शुभ रंग : मोरपीशी | अंक : ५
आज काही पेचप्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल.प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची हमखास साथ मिळेल.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. सहकारी तुमचा आदर करील. ध्येय साध्य होतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser