आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 29 मे रोजी पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शुभ नावाचा खास योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : केशरी | अंक : २
एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल. दुरावलेली नाती जवळ येतील.

वृषभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ३
घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे, वादविवाद होतील.हितशत्रू सक्रिय अाहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी|अंक : २
नोकरदारांना कंटाळवाणी कामे करावी लागतील. काही मानापमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल.

कर्क : शुभ रंग : गुलाबी|अंक : ४
नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. आत्मविश्वास वाढवणारी घटना घडेल.

सिंह : शुभ रंग : केशरी|अंक : ६
व्यापार-उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपुरे व्यवहार पूर्ण होतील. आनंदी दिवस.

कन्या : शुभ रंग : पांढरा|अंक : ५
काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहावे.

तूळ : शुभ रंग : पिवळा | अंक : ८
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्या.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७
तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मन:स्थितीही चांगली राहील.

धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ९
घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. एखाद्या सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.

मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ४
काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे.

कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : ३
उच्च शिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल. गृहिणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जून वेळ काढतील.

मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस. आज नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. सतर्क राहा.

बातम्या आणखी आहेत...