आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 3 एप्रिल रोजी मूळ नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजची ग्रहस्थिती वरियान नावाचा योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभाचा दिवस असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : १
नवीन व्यावसाय असेल तर आर्थिक धाडस करताना आपली कुवत अोळखा. कर्ज प्रस्ताव रखडतील.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन याच्या जोरावर प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. नवे हितसंबंध जुळतील. वैवाहिक जीवनात आज आय लव्ह यू म्हणून टाका.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ४
कार्यक्षेत्रात विरोधकांच्या कारवाया वाढलेल्या आहेत. एखादा हितशत्रू मित्रांमध्येच लपलेला असू शकतो. आज काही येणी असतील जर वसूल होऊ शकतील.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ५
काही रसिक मंडळी काम सोडून करमणुकीस प्राधान्य देतील. दुरावलेली मित्रमंडळी जवळ येतील.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
विरोधकांचा विरोध मावळेल. कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. ध्येये साध्य करता येतील.

कन्या : शुभ रंग : मरून| अंक : ७
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. जमाखर्चाचा मेळ घालणे जरासे अवघड जाईल.

तूळ : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
आज काही मनाजोगत्या घटना घडल्याने तुमचा कार्यउत्साह वाढेल. महत्त्वाच्या चर्चेत अग्रेसर राहाल.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा|अंक : ९
स्वत:चेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्याकडून हट्टीपणाने काही चुकीचे निर्णय घेतले जातील.

धनू : शुभ रंग : भगवा| अंक : ८
आज काही पेचप्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. भक्तिमार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल.

मकर : शुभ रंग : चंदेरी| अंक : २
व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

कुंभ : शुभ रंग : आकाशी|अंक : ४
आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. इच्छित ध्येये साध्य होतील.

मीन : शुभ रंग : सोनेरी|अंक : ३
आज ऐकावे जनाचे व करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या अश्वासनांना भुलू नका.

बातम्या आणखी आहेत...