आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 3 जुलै रोजी रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ४
रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी आहे. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.

वृषभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ९
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात घ्या. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.

मिथुन : शुभ रंग : हिरवा|अंक : १
नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे.

कर्क : शुभ रंग : पांढरा|अंक : ३
नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावर ढकलेली बरी.शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७
नोकरदारांना ओव्हर टईम करावा लागणार आहे.वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहीक जिवनात गोडवा राहील. मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. संततीकडून सुवार्ता.

तूळ : शुभ रंग : मोरपिशी| अंक : ५
टेलिफोन व लाईट बिले भरावी लागणार आहेत काही देणीही चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील. डोळ्यांची निगा राखा.

वृश्चिक : शुभ रंग : मरून | अंक : ६
आवक मनाजोगती असल्याने मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील.

धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ३
आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.

मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ४
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदीन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

मीन : शुभ रंग : निळा | अंक : १
घरात अधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर अनेक संधी चालून येतील. नवे कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.

बातम्या आणखी आहेत...