आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 3 ऑक्टोबर रोजी रेवती नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : मरून| अंक : ७
भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होणार आहे. काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने पार पाडावे लागतील.

वृषभ : शुभ रंग : केशरी| अंक : १
मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दुरावलेले नातलग जवळ येतील. आज पैसा पुरेसा असल्याने मनासारखा खर्च करता येतील. आज आनंदी दिवस.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
अत्यंत उत्साहवर्धक दिवस. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या गुणांची दखल घेतील. वढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. आज कर्तव्यास प्राधान्य द्याल.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
उच्चशिक्षितांना विदेशगमनाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. भक्तिमार्गात असलेल्यांना सद्गुरू कृपेचा लाभ होईल.

सिंह : शुभ रंग : गुलाबी|अंक : २
कार्यक्षेत्रात मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. काही मानापमानांच्या प्रसगांना तोंड द्यावे लागू शकते.

कन्या : शुभ रंग : माेरपिशी|अंक : १
नवीन मित्रपरिवार वाढेल. भविष्याच्या दृष्टीने काही फायदेशीर ओळखी होतील. आशादायी दिवस आहे.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : आकाशी|अंक : ३
बेरोजगारांच्या भ्रमंतीस यश येईल. हाती असलेले पैसे जपून वापरा. डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी|अंक : ५
मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागतील.त्यांच्या शिस्तीकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

धनू : शुभ रंग : निळा| अंक : ८
स्थावर इस्टेटीविषयी रखडलेल्या कामांना चालना मिळेल. आपले मत इतरांना पटवून देऊ शकाल.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
लेखक व कवींच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहा.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ६
आज तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील.

मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९
मानसिक शांतता लाभेल व आरोग्यही उत्तम राहील. नोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकमणे काम कराल. काही जुन्या चुकाही निस्तराल.