आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 30 एप्रिलला अश्विनी नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : मरून| अंक : ५
आज काही येणी असतील तर वसूल होतील. काल हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता आहे.

वृषभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ८
जमाखर्चाचा मेळ बसवताना नाकी नऊ येतील. परदेशाशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
तुमचा कामातील उरक चांगला राहील. मुले आज अभ्यास मनापासून करतील. अपेक्षित लाभ होतील.

कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ७
आज कामाच्या ठीकाणी काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल. आज वडीलांनी दिलेले सल्ले डावलू नका.

सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
महत्वाच्या कामांना विलंब होईल. तरूणांनी कुसंगत टाळावी. ज्येष्ठांना सत्संगातुनच मन:शांती मिळेल.

कन्या : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
कंटाळवाणा दिवस, कामाचा डोंगर वाढत जाईल. मोफत सल्लागार मंडळी भलतेच बोअर करतील.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. आज घरी पत्नी आतुरतेने वाट पहात असेल.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी| अंक : २
नोकरदारांना आज ओव्हर टाईम करावा लागेल. ज्येष्ठांना काही आरोग्याच्या तक्रारींना तोंड द्यावे लागेल.

धनु : शुभ रंग : निळा | अंक : ८
रसिक मडळी जिवाची मुंबई करतील. प्रेम प्रकरणे फुलतील, बहरतील. आरोग्य उत्तम साथ देईल.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : १
कितीही पैसा आला तरी कमीच पडेल. मुलांचे लाड आवरते घ्या, त्यांच्या शिस्तीस प्राधान्य देणे गरजेचे.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
आज एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत होइल.मातोश्रींशी काही मतभेद संभवतात. व्यस्त दिवस.

मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
खिसे वजनदार असल्याने तुमचा आज कामातील उत्साह चांगला असेल. गृहीणी हसतमुख असतील.

बातम्या आणखी आहेत...