आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शनिवार 30 जानेवारी रोजी मघा नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर शनिवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...
मेष : शुभ रंग : हिरवा| अंक : ८
शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.
वृषभ : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
ऑफिस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे. कदाचित वाहन रस्यात रूसून बसेल. वादविवाद टाळा व गोड बोलून स्वार्थ साधा.
मिथुन : शुभ रंग : क्रीम| अंक : ६
सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. मनासारखा मानपान मिळाल्याने महिला खुश असतील.धनस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असल्याने खिसे गरम असतील.
कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
आज तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.
सिंह : शुभ रंग : चंदेरी|अंक : ९
बचतीचा विचार आज तरी सोडूनच द्या. घरातील थोर मंडळी आपलेच खरे करतील. कमीच बोला.
कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ८
काही अपुरे व्यवहार पूर्ण होतील. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील.
तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. कर्तव्यास प्राधान्य द्याल.
वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : १
नोकरी-धंद्यात अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या लोकांत मिळून मिसळून राहा.
धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ५
आपल्या प्रतिष्ठेची काळजी घ्या. गैरव्यवहार टाळा. कुसंगतीपासून लांबच राहायला हवे.
मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत मेहनतीशिवाय दुसरा पर्याय नाही. वैवाहिक जीवनात तू तिथे मी.
कुंभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ४
ज्येष्ठांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारूच नका.
मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
मानसन्मानात वृध्दी होईल. प्रेमी युगुलांना घरातील मोठयांचे आशिर्वाद मिळतील. रूग्णांना हॉस्पीटल मधून डिस्चार्ज मिळेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.