आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 31 ऑक्टोबर रोजी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस...

मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
एखाद्या चांगल्या बातमीने दिवसाची सुरुवात होईल.आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल.

वृषभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
कामधंद्यात काही अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. आज घरातील वडिलधारी मंडळी हट्टीपणाने वागतील. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नकोत.

मिथुन : शुभ रंग : मोरपिशी| अंक : ७
आज पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस.जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
सडेतोड बोलण्यामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवा.

सिंह : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५
अति श्रमांमुळे थकवा जाणवेल. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. संयम ठेवा.

कन्या : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या चर्चा आज टाळलेल्याच बऱ्या.

तूळ : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९
आज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवास होतील.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. प्रेमप्रकरणे मात्र डोक्याला नसता ताप देतील.

धनु : शुभ रंग : क्रिम| अंक : २
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : १
वास्तू खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कुंभ : शुभ रंग : मोतिया|अंक : ३
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरुणांनी व्सनसंपासून दूर राहणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी.

मीन : शुभ रंग : मरून|अंक : ६
सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस असून दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. नव्या ओळखीतून व्यवसायवद्धी होईल.