आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 4 सप्टेंबर रोजी दिवसाची सुरुवात पुष्य नक्षत्रामध्ये होत आहे. या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीमुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभाचा दिवस असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : भगवा| अंक : १
कौटुंबिक जीवन समाधानी असेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. प्रेमप्रकरणे मात्र मनस्तापच देतील.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
बेरोजगारांना रोजगार मिळेल. भावंडांमधील गैरसमज दूर होतील. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता|अंक : २
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यशाची चाहूल लागेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आवक पुरेशी असली तरी अनावश्यक खर्चात कपात गरजेची. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे.

सिंह : शुभ रंग : क्रीम| अंक : ५
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा गैरवापर टाळावा. घराबाहेर क्रोधावर लगाम हवा.

कन्या : शुभ रंग : सोनेरी| अंक : ९
कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाहविषयी बोलणी करायची असतील आज दिवस योग्य.

तूळ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ७
आज नोकरीच्या ठिकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्त्वपूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या.

धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ताकही फुंकून प्यावे.

मकर : शुभ रंग : मारपंखी| अंक : ९
दुकानातील गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. नोकरदार वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. छान दिवस.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी आज गोड बोलून स्वार्थ साधाल.

मीन : शुभ रंग : मोतिया| अंक : ३
उच्चशिक्षित तरुणांच्या अपेक्षा वाढतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कलाकारांना ग्लॅमर मिळेल.

बातम्या आणखी आहेत...