आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 5 डिसेंबर रोजी पुष्य नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : मरून| अंक : १
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असेल, तरीही गृहिणी आज बचतीस प्राधान्य देतील.

वृषभ: शुभ रंग : राखाडी| अंक : ३
आज घराबाहेर रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अति स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. काही गुपिते उघड होतील.

मिथुन : शुभ रंग : आकाशी| अंक : ५
पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.

कर्क : शुभ रंग : निळा| अंक : २
अथक परिश्रमांच्या साहाय्याने आज प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. योग्य माणसे संपर्कात येतील.

सिंह :शुभ रंग : चंदेरी| अंक : १
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल.

कन्या : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
प्रतिष्ठितांच्या ओळखी फायदेशीर राहील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस.

तूळ : शुभ रंग : सोनेरी|अंक : ३
व्यवसायात प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ६
आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे हिताचे. मोफत सल्ले देऊच नका.

धनु : शुभ रंग : भगवा| अंक : ५
आज कायद्यात रहाल तरच फायद्यात रहाल. वैवाहिक जीवनांत जोडीदारास प्रश्न न विचारणे हिताचे राहील.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
व्यवसायात भागीदारांशी सलोखा राहील. वैवाहिक जीवनांतील किरकोळ मतभेद सामंजस्याने मिटतील.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी|अंक : ७
नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालावे लागणार आहे.

मीन : शुभ रंग : मोतिया|अंक : ९
हौशी मंडळींना आज जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser