आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 5 फेब्रुवारीला उत्तर भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज वसंत पंचमी आहे. आजच्या या शुभ संयोगाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. शनिवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ३
मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दूरावलेले नातलग जवळ येतील. असलेले पैसे जपून वापरा.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होईल. काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने पार पाडावे लागतील.

मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
उच्चशिक्षितांना विदेशगमनाचे वेध लागतील. महत्वाचे निर्णय घेताना मात्र आज द्विधा मनस्थिती होणार आहे.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ६
कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडू शकतील. अशावेळी मानसिक संतूलन ढळू न देणे गरजेचे आहे.

सिंह : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७
व्यावसायात महत्वाचे करार मदार यशस्वी होतील. वादविवादात आपल्याच मतावर ठाम राहू शकाल.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : २
आज नोकरीच्या ठीकाणी प्रामाणिकमणे काम कराल.एखादा महत्वाचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे.

तूळ : शुभ रंग : मरून | अंक : १
मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागतील. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनची चाहूल लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ४
स्थावर इस्टेटी विषयी रखडलेली कामे गती घेतील. नव्या ओळखी होतील. मौल्यवान खरेदी कराल.

धनु : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
महत्वाची कामे विलंबाने होतील. मुलांचे वाढते हट्ट पुरवावे लागतील. भावनेच्या भरात वचने देऊ नका.

मकर : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
नव्या ओळखीतून व्यवसायवृध्दी होईल. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सतर्क रहा.

कुंभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. छान दिवस.

मीन : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
नोकरीच्या ठीकाणी वढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात खोेळंबा होईल. संयम ठेवा.

बातम्या आणखी आहेत...