आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 5 नोव्हेंबर रोजी उत्तर भाद्रपदा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष | शुभ रंग :पिस्ता, शुभ अंक : ९
आज दिवस खर्चाचा आहे. बचतीचा विचारच सोडून द्या. घरात थोरामोठ्यांशी काही वैचारिक मतभेद होतील. आज गरजेपुरते आध्यात्मिकही व्हाल. वाद मात्र टाळा.

वृषभ | शुभ रंग :आकाशी, शुभ अंक : १
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस, जे जे चिंताल ते ते होईल. कदाचित तुमच्या पात्रतेपेक्षा अधिकच काहीतरी पदरात पडेल. आज फक्त शुभ बोला व शुभ चिंता.

मिथुन | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ४
आज तुम्ही भावनेपेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

कर्क | शुभ रंग:निळा, शुभ अंक : २
आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्कीच. सज्जनांचा सहवास लाभेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल.

सिंह | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ३
कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वत:ला जपा. आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वासातील व्यक्तीकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

कन्या | शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : ४
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

तूळ | शुभ रंग:सोनेरी. शुभ अंक : ३
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ५
हौशी मंडळी जिवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वत:चे लाड पुरवण्यासाठी पैसा व वेळही खर्च कराल. गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

धनु | शुभ रंग: भगवा, शुभ अंक : ८
आज काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे वाटेल. गृहोद्योग करणाऱ्या महिलांची आवक वाढेल. आज तुम्हाला मुलांच्या अभ्यासात लक्ष घालावे लागणार आहे.

मकर | शुभ रंग: लाल, शुभ अंक : ९
आज नोकरदारांना बढती-बदलीविषयी समाचार येऊ शकतात. मुले अभ्यासात चालढकलच करतील.गृहिणींनी सासुबाईंकडून शाबासकीची अपेक्षा करू नये.

कुंभ | शुभ रंग : निळा, शुभ अंक : ७
आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. महत्त्वाच्या चर्चेत वाद टाळून सुसंवाद साधा. गृहिणींना काही प्रिय पाहुण्यांची उठबस करावी लागेल.

मीन | शुभ रंग :पांढरा, शुभ अंक : ६
आज स्वत:चेच खरे करू नका. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. आज तुम्ही गोडबोल्या मंडळींपासून सावधच राहा.

बातम्या आणखी आहेत...