आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 6 फेब्रुवारी रोजी अनुराधा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग: राखाडी| अंक : १
आज वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. आपले मत मांडण्याची घाई नको. वाहनाच्या वेगावर ताबा ठेवा.

वृषभ: शुभ रंग: जांभळा| अंक : ६
वैवाहीक जिवनांत असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. व्यवसायाच्या ठीकाणी भागिदारांचे एकमत राहील. आनंदी दिवस.

मिथुन : शुभ रंग : निळा| अंक : ७
व्यावसायिकांची जुनी उधारी वसूल होईल. दुकानांत गिऱ्हाईकांची वर्दळ वाढू लागेल. प्रामाणिक कष्टांसाठी दैव अनुकूल असेल. ममा मावशीकडून लाभ होतील.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : ८
घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. योग्य माणसे संपर्कात येतील. अनुकूल दिवस.

सिंह :शुभ रंग : मोरपंखी|अंक : ९
कुठेही न जाता आज घरीच आराम करण्याकडे तुमचा कल राहील. आज गृहोद्योग तेजीत चालतील.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ५
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल.

तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : ६
आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमची काही गुपिते उघड होऊ शकतील.

धनु : शुभ रंग : केशरी| अंक : १
चूकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. ज्येष्ठांना डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत. खर्च वाढेल.

मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठया लोकांत असलेली तुमची उठबस फायदेशीर राहील.

कुंभ : शुभ रंग : क्रिम| अंक : ४
तुमचा कामातील उत्साह तुमच्या सहकाऱ्यांना प्रेरणा देईल. आज तुम्ही कार्यक्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल.

मीन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...