आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साध्य नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

शनिवार 6 जून रोजी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...


मेष: शुभ रंग : मरून | अंक : ८

आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.


वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ६

तुमचे मनोबल उत्तम राहील. सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर मात्र थोडीफार अस्वस्थता जाणवेल. आर्थिक व्यवहार दुपारपूर्वी उरका.


मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.


कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ७

कार्यक्षेत्रात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. पत्नीचेही मूड सांभाळाल.


सिंह : शुभ रंग : केशरी | अंक : ८

कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. आज मुले अज्ञा पाळतील.


कन्या : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६

कौटुंबिक वाद दुपारनंतर ते सुसंवादाने मिटवता येतील. आज तुम्ही घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल.


तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : ७

महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. अपेक्षित मेल्स येतील.


वृश्चिक : शुभ रंग : हिरवा | अंक : ५

आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील.


धनू : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास नकाे. काही हरवले असल्यास गवसेल.


मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : १

प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील.


कुंभ : शुभ रंग : निळा | अंक : ४

नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा जोर कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.


मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २

मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने आत्मिक बळ वाढेल. आज सत्संगाची गरज. 

0