आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 7 मे रोजी पुनर्वसू नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शूल नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ६
घरात अधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील. नवे कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी आहे. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.

मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ५
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात घ्या. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : ४
नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे.

सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावर ढकलेली बरी.शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७
नोकरदारांना ओव्हर टईम करावा लागणार आहे.वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ३
जिवलग मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहीक जिवनात गोडवा राहील. मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. संततीकडून सुवार्ता.

वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
हौसमौज करण्यावर मर्यादा येतील. आज काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे रहाणार आहेत. कर्ज हप्ते फेडावे लागतील. डोळ्यांची निगा राखा.

धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : २
आवक मनाजोगती असल्याने मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील.

मकर : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९
आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : १
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदीन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.

मीन : शुभ रंग : लाल | अंक : २
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

बातम्या आणखी आहेत...