आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 7 नोव्हेंबर रोजी पुनर्वसू नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शुभ नावाचा खास योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : १
कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. गृहिणींनी झाकली मुठ झाकलीच ठेवावी.

वृषभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्त्वाचे मेल्स येणार आहेत. दुपरानंतर प्रवासास निघाल.

मिथुन : शुभ रंग : तांबडा| अंक : २
तब्येत ठणठणीत राहील. आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. प्रभावी वक्तृत्वाने समोरच्यास प्रभावित कराल.

कर्क : शुभ रंग : क्रीम| अंक : ४
व्यावसायिक करार दुपारनंतर करावे. काही हरवले असेल तर सापडेल.आपलीच मर्जी चालवाल.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५
आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्त्वपूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.

कन्या : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.

तूळ : शुभ रंग : पांढरा|अंक : ६
विरोधकांचा विरोध कमी होईल. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. मित्रांच्या मदतीस धाऊन जाल.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी|अंक : ९
आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगात मन रमेल.

धनू : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनी राग अनावर होईल.महत्त्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळल्यात तर बरे.

मकर : शुभ रंग : लाल| अंक : १
कौटुंबातील आनंदी घटना तुमचा उत्साह वाढवतील. प्रेम प्रकरणांना थोरांचे आशीर्वाद मिळतील.

कुंभ : शुभ रंग : पिस्ता|अंक : ६
उद्योग-व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. कार्यक्षेत्रात गाफील राहू नका.

मीन : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ५
काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. उद्योग-धंद्यात उत्साही वातावरण राहील. आज मुले आज्ञाधारकपणे वागतील.