आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 8 ऑगस्ट रोजी उत्तर भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : चॉकलेटी | अंक : ३
आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. देण्याघेण्याच्या व्यवहारात फसवणूक.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ४
नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर होणार आहेत. आज तुमची कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज सरकार दरबारी कामे रखडणार आहेत. दानधर्म कराल.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : २
आज नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेणार अाहेत. वडीलधाऱ्या मंडळींची मते विचारात घेणे गरजेचे आहे.

सिंह : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
आज काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील.
कन्या : शुभ रंग : तांबडा|अंक : ७
कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. घरी जोडीदाराच्याही भावना समजून घेणे हिताचे आहे.

तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ६
येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील.

धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

मकर : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ३
विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. नेते मंडळींची लोकप्रियता वाढेल. नेतृत्व गाजवाल.

कुंभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असले तरी पुरेसा पैसाही उपलब्ध होणार आहे.

मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २
आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. रागाऊन निघून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी परत येतील.

0