आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 8 जानेवारी 2022 उत्तर भाद्रपदा नक्षत्रामुळे वरियान नावाचा योग जुळून येत आहे. मंगल कार्यासाठी हा योग उत्तम आहे. यात निश्चितच यश मिळेल. यासोबतच ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार, 7 राशींच्या व्यक्तींना पैशांची बाबतीत आनंदवार्ता कळण्याची शक्यता आहे. नोकरदार आणि व्यापाऱ्यांना काम वाढणार आहे. विद्यार्थी व गृहिणींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे. उर्वरित 5 राशींसाठी मात्र दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल.

वृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. यशदायी दिवस.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
आज नोकरदार मंडळी वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी मंडळी कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालतील.

कर्क : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७
शासकिय कामे रखडतील. श्रध्दाळू गृहीणींचा देवधर्म चालूच राहील. आज देवही नवसाला नक्की पावेल.

सिंह : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळा.

कन्या : शुभ रंग : मरून| अंक : १
व्यवसायात तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करायला समर्थ असाल. जोडीदाराची भक्कम साथ राहील.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : २
दैनंदीन कामात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
आनंदी व उत्साही असा आज दिवस असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.

धनु : शुभ रंग : भगवा | अंक : ४
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून तुम्ही कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे गरजेचे आहे. तुमची काही गुपिते उघड होतील. कमीच बोला.

कुंभ : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचा प्रभाव पडेल. भावंडांमधे क्षुल्लक कारणाने कटुता येईल.

मीन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ३
अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेवता येतील. योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील.

बातम्या आणखी आहेत...