आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात तरीही 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील खास, हे आहे कारण...

शनिवार 9 मे 2020 ला अनुराधा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती परीघ नावाचा अशुभ योग तयार करत आहे परंतु हा योग सकाळी 9 वाजून 35 मिनिटांपर्यंत राहील आणि त्यानंतर शिवा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या ग्रह स्थितीचा शुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार..

  • मेष: शुभ रंग : मरून | अंक : ९

मनाच्या द्विधा अवस्थेत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता आहे. विरोधकांना व स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. धाडसाची कामे टाळा.

  • वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५

आर्थिक उलाढाली भागिदारांना विश्वासात घेऊनच करा. वैवाहीक जिवनांत गोडवा असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल.

  • मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : १

नोकरीच्या ठीकाणी हितशत्रूंचा उपद्रव वाढलेला जाणवेल. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्या. तरूणांनी कुसंगत टाळावी. व्यसने घात करतील.

  • कर्क : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

आज तुमचा अधुनिक राहणीमानाकडे कल राहील.हौसमौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्रमै़त्रिणींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

  • सिंह : शुभ रंग : क्रिम | अंक : ७

बराच काळ रखडलेल्या घरगुती कामांसाठी वेळ काढावा लागेल. मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष द्यावेच लागणार आहे. वाहन खरेदीची कामे मार्गी लागतील.

  • कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ९

आज एखाद्या महत्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. बराच वेळ घराबाहेरच जाईल. आज घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा. वादविवाद टाळावेत.

  • तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ६

उद्योग व्यवसायात मनाजोगती धनप्राप्ती होईल, नवे हितसंबंध तयार होतील. इतरांना दिलेले शब्द पाळू शकाल. प्रवासात आपल्या वस्तूंची काळजी घ्या.

  • वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : २

आज केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारूच नका. मागून नावे ठेवणाऱ्या मंडळींकडे दुर्लक्ष करा.

  • धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४

कंजूषपणा बाजूला ठेऊन आज काही अवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही खोटी स्तुती करणारी मंडळी भेटतील, सतर्क रहा. मित्रांना पार्टी आज नको.

  • मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ५

आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांची फळे दृष्टीक्षेपात येणार आहेत.

  • कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३

आज रिकामटेकडया गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल.

  • मीन : शुभ रंग : पांढरा| अंक : १

काही क्षुल्लक अडचणींनी नैराश्य येण्याची शक्यता आहे. घरातल्या थोर मंडळींचेही उपदेश ऐकून बोअर व्हाल. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.

बातम्या आणखी आहेत...