आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 9 मे रोजी रेवती नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग: पांढरा| अंक : ४
काही दूरावलेली नाती आज नव्याने जवळ येणार आहेत. गृहीणींना आज आर्थिक अडचणींवर मात करण्यास पूर्वीची बचत कामी येणार आहे.

वृषभ: शुभ रंग: पिस्ता| अंक : १
आज सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील. नेकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल.

मिथुन : शुभ रंग : भगवा| अंक : २
मित्र दिलेले शब्द पाळतील. हाती पैसा पुरेसा असल्याने मनासारखा खर्च करता येतील. आज आनंदी दिवस.

कर्क : शुभ रंग : मरून| अंक : ८
व्यवसायात प्रतिकूलता जाणवेल. जाहीरातीवर खर्च वाढवावा लागेल. काही जुन्या तत्वांना मुरड घालावी लागेल. शेजाऱ्यांच्या मदतीने काही कामे सोपी होतील.

सिंह :शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ९
महत्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालू राहील. हाती असलेले पैसे जपून वापरा.

कन्या : शुभ रंग : क्रिम|अंक : ७
वैवाहिक जिवनात एकमत असून कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. जोडीदारास सरप्राईज गिफ्ट द्याल.

तूळ : शुभ रंग : सोनेरी| अंक : २
आज कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल व तुमचे आरोग्यही उत्तम राहील.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
नोकरीच्या ठीकाणी आज वरीष्ठांचे दडपण जाणवेल. भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होणार अाहे.

धनु : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १
कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडू शकतील. अशावेळी संयम महत्वाचा असेल. वाहन हळू चालवा.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : ३
उच्चशिक्षितांना परदेशगमनाच्या संधी दृष्टीक्षेपात येतील.महत्वाचे निर्णय घेताना मात्र द्विधा मनस्थिती होईल.

कुंभ : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
आज काही तब्येतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. मेहनतीस आज नशिबाची साथ मिळेल.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
कौटुंबिक सुखात वृध्दीच होईल. आज जोडीदाराकडून असलेल्या तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. आनंदी दिवस.

बातम्या आणखी आहेत...