आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रहांचे राशी परिवर्तन:कुंभ राशीत शनि अस्त, 7 तारखेला मकर राशीत येणार बुध

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच शनि अस्त होत आहे. यानंतर एक दिवसाने बुधाचे राशी परिवर्तन होईल. त्यानंतर 5 दिवसांनी सूर्य राशीत बदल होईल. या ग्रहांच्या राशी परिवर्तनाने बरेच बदल घडून येतील.

शनि अस्त तर बुध आणि सूर्याच्या राशी बदलामुळे अनेक चढ-उतार येतील. काही दिवस त्रिग्रही योगही तयार होईल. ज्योतिषांच्या मते या ग्रहांच्या चाली बदलामुळे सोन्यात चढ-उतार होतील. शेती आणि व्यवसायात फायदा होईल.

पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्रसांगतात की रविवार, 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास कुंभ राशीत शनि अस्त होईल. यानंतर, 10 मार्च रोजी, ते त्यांच्या सामान्य स्थितीत परत येतील. यानंतर मंगळवार, 7 फेब्रुवारीला बुध मकर राशीत सूर्यासोबत येईल. बुध-सूर्य मकर राशीत आल्याने बुधादित्य योग तयार होईल. त्यानंतर सोमवार, 13 फेब्रुवारीला सूर्य मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत शनिसोबा येईल. यामुळे कुंभ राशीत सूर्य, शुक्र आणि शनि यांचा त्रिग्रही योग तयार होईल.

ग्रहांचा प्रभाव... हवामान बदलणार, शेअर बाजारात मोठी उलथापालथ
या ग्रहांच्या बदलामुळे अचानक हवामानात बदल होईल. देशात अनेक ठिकाणी अचानक थंडी वाढू शकते. यासोबतच शेअर बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या ग्रहांमुळे प्रशासकीय निर्णयांमुळे देशात वाद वाढण्याची शक्यता आहे. लोकांमध्ये मतभेद वाढू शकतात. अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार उघड होऊ शकतो.

सरकारी नोकरदारांच्या कामकाजात अडथळे येऊ शकतात. या ग्रहस्थितीमुळे लोकांमध्ये अनिश्चितता राहील. काय करावे आणि काय करू नये ही परिस्थिती अनेक लोकांसोबत राहील आणि ग्रह-ताऱ्यांची साथ मिळणार नाही.

काशी विद्वत परिषदेचे सरचिटणीस प्रा. रामनारायण द्विवेदी स्पष्ट करतात की सूर्य-बुधाचा शुभ संयोग कृषी क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनात वाढ करेल. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना फायदा होईल. मोठी गुंतवणूक आणि व्यवहार होतील. प्रसारमाध्यमे आणि वकिलीशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला राहील. या शुभ योगामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळतील. यासोबतच व्यावसायिक क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...