आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 3 सप्टेंबर रोजी पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ८
वैवाहीक जिवनात गोडवा राहील. मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. छान दिवस.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ४
नोकरदारांना जास्त वेळ थांबून काम करावे लागेल. वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावरच ढकलेली बरी.सरकार दरबारी कामे रखडतील. गृहीणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. कुणावरही अवलंबून राहू नका.

सिंह :शुभ रंग : मरून|अंक : ९
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६
एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ८
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. येणी वसूल होतील.

धनु : शुभ रंग : भगवा | अंक : ३
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदीन कामातही काही अडथळे येतील.

मकर : शुभ रंग : पिवळा| अंक : ५
आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील.

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : १
आवक मनाजोगती असल्याने तुमची मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेस यशस्वीपणे तोंड द्याल.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
टेलिफोन व लाईट बिले भरावी लागणार आहेत काही देणीही चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील.

0