आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज शनीचे राशी परिवर्तन होत आहे. 30 वर्षांनंतर, न्यायाचा देव मकर राशी सोडेल आणि कुंभ राशीत प्रवेश करेल. पण या राशीत शनिदेव अडीच वर्ष नाही तर फक्त 75 दिवस राहतील. 5 जून रोजी ते वक्री होऊन म्हणजेच, उलटे चालत त्यांचा वेग अधिक मंद होईल. यानंतर, 12 जुलै रोजी पुन्हा मकर राशीत येतील आणि वर्षभर मकर राशीतच राहील. पुढील वर्षी 17 जानेवारी 2023 रोजी शनी पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करेल आणि दीर्घकाळ याच राशीत राहील.
देश आणि जगावर शनीचा प्रभाव...
ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्यानुसार, शनी सुमारे अडीच वर्षे आपल्याचा घरात राहणार आहे. त्यामुळे हा बदल देशासाठी फायदेशीर ठरणार आहे. धान्याच्या चांगल्या उत्पादनासह बाजारात तेजी येण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रगती होईल, पण नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होऊ शकतो. या वर्षी शनिदेव वक्री होऊन पुन्हा मकर राशीत येतील. त्याच्या दुष्परिणामांमुळे दहशतवादी घटनांमध्ये वाढ होऊ शकते. महत्त्वाच्या पदांवर असलेल्यांना सुरक्षितता आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अस्थिरता वाढू शकते.
शनिदेवाचा कसा पडेल प्रभाव
शनीच्या शुभ प्रभावामुळे लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे समोर येतील. काही नोकरदार लोकांच्या बदलीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पदोन्नती होऊ शकते. कामाच्या जबाबदाऱ्या वाढण्याचीही शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी बदल होईल. राहण्याचे ठिकाण देखील बदलू शकते. त्याचवेळी, त्याच्या अशुभ प्रभावामुळे, काही लोकांच्या पायाला किंवा हाडांना दुखापत होऊ शकते. ऑपरेशनची स्थिती देखील तयार होऊ शकते. साडेसाती असलेल्यांना कर्ज घ्यावे लागेल. कामाच्या ठिकाणी वारंवार बदल होतील.
धनु राशीची साडेसात समाप्त तर मीन राशीची सुरु होईल
धनु, मीन, वृश्चिक आणि कर्क राशीवर शनीच्या राशी बदलाचा सर्वाधिक प्रभाव राहील. डॉ मिश्र सांगतात की, 29 एप्रिलपासून धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून आराम मिळेल, पण त्याचा अशुभ प्रभाव मीन राशीवर सुरू होईल. त्याच वेळी, कर्क आणि वृश्चिक राशीचे लोक शनीच्या प्रभावाखाली असतील. शनिदेवामुळे या राशीच्या लोकांना यशासाठी जास्त मेहनत करावी लागेल आणि आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल.
या उपायांनी शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होईल
शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी रोज ऊं प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम: या मंत्राचा जप करावा. शनि मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. शनिदेवाला तिळाचे तेल आणि काळे उडीद अर्पण करा. मधल्या बोटात घोड्याच्या नालची अंगठी घाला. गरजू लोकांना अन्नदान करा. तसेच कपडे, पाणी, छत्री आणि पादत्राणे दान करा. रोज सकाळी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ मिसळून पाणी अर्पण करावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.