आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षी, शनी फक्त एकदाच राशी बदलेल आणि 17 जानेवारीपासून स्वतःच्या कुंभ राशीत राहील. यामुळे धनु राशीच्या लोकांची साडेसाती संपुष्टात येईल. मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना ढय्यापासून दिलासा मिळेल. या दरम्यान हा ग्रह 140 दिवस वक्री आणि 33 दिवस अस्त राहील. शनीच्या या राशी परिवर्तनाचा देश आणि जगासह सर्व राशींवर परिणाम होईल.
मीन राशीला सुरु होणार साडेसाती
शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच मीन राशीला साडेसाती सुरू होईल आणि धनु राशीच्या लोकांना यापासून दिलासा मिळेल. अशा प्रकारे मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर वर्षभर शनि साडेसातीचा प्रभाव राहील. यामध्ये मकर राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. पण कुंभ आणि मीन राशीचे लोक अडचणीत येऊ शकतात. या दोन्ही राशीच्या लोकांना दुखापत होऊ शकते. कामात नको असलेले बदल होण्याचीही शक्यता आहे.
कर्क आणि वृश्चिक राशीवर ढय्या
मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना शनीच्या राशी बदलामुळे ढय्यातून आराम मिळेल. या राशीच्या लोकांना फायदा होईल. पण कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची ढय्या सुरू होईल. यामुळे या दोन राशीच्या लोकांची ट्रान्स्फर होण्याची, नोकरी आणि व्यवसायात जबाबदारी बदलण्याची शक्यता आहे. धावपळ वाढू शकते. वाद होऊ शकतात. खूप मेहनत केल्यावरच यश मिळेल. त्यामुळे या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.
देश आणि जगावर शनीचा प्रभाव
शनीचा कुंभ राशीत प्रवेश झाल्यावर देशात बांधकाम वाढेल. पाश्चिमात्य देशांमध्ये वाद वाढू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. खालच्या वर्गातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अशा लोकांना पदे आणि अधिकारही मिळू शकतात. मात्र, शेजारील देशांसोबत भारताच्या सीमेवर तणाव आणि वाद कायम राहतील. शनीच्या प्रभावामुळे देशात मोठे कायदेशीर निर्णय होऊ शकतात. अवैध काम करणाऱ्यांना शिक्षा होऊ शकते. जे लोक दीर्घकाळापासून मेहनत करत आहेत त्यांना या वर्षी यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
अशुभ प्रभावापासुन दूर राहण्यासाठी करावी हनुमान पूजा
शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी दर शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. मंगळवारी हनुमानाची पूजा केल्यानेही शनिदोष कमी होतो. शनिवारी पितळेच्या ताटात किंवा भांड्यात तेल भरून त्यात आपला चेहरा पाहावा. नंतर शनिदेवाला नमस्कार करून तेलाने भरलेले पितळेचे भांडे दान करावे. यासोबतच काळे तीळ, घोंगडी, काळी उडीद, लोखंडी भांडी, शूज, चप्पल यांचेही दान करता येते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.