आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्योतिष:आता एकत्र 5 ग्रह राहतील वक्री, राशीनुसार काय करावे आणि काय करू नये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 मेपासून गुरु ग्रह वक्री आणि सूर्याने बदलली राशी, शनी आणि राहू-केतू पूर्वीपासूनच वक्री

गुरुवार 14 मे रात्रीपासून गुरु ग्रह वक्री झाला आहे. यापूर्वीच शनी आणि शुक्र ग्रहसुद्धा वक्री झाले आहेत. राहू-केतू नेहमी वक्रीच राहतात. अशाप्रकारे आता नऊ पैकी पाच ग्रह वक्री झाले आहेत. गुरुवारी रात्रीच सुऱ्यानेही राशी परिवर्तन केले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ग्रहांच्या स्थिती बदलल्यामुळे राशीनुसार काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास या ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून बचाव होऊ शकतो. येथे जाणून घ्या, राशीनुसार कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

मेष, कर्क, तूळ, मकर, कुंभ राशीच्या लोकांनी हलगर्जीपणापासून दूर राहावे. अन्यथा पूर्ण होत आलेले कामही बिघडू शकते. 

वृषभ, कन्या, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ कठीण राहू शकतो. या लोकांनी धर्य बाळगून काम करावे. वरिष्ठ लोकांचा सल्ला घेऊनच पुढे जावे. मानसिक तणावापासून दूर राहावे.

मिथुन, सिंह, धनु आणि मीन राशीच्या लोकांना मेहनतीनुसार फळ मिळण्याचे योग जुळून येत आहेत. यामुळे आळसापासून दूर राहावे. सतर्क राहून काम करावे. छोटीशी चुकाही मोठे नुकसान करू शकते.

ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. शिवलिंगावर तांब्याच्या कलशाने जल अर्पण करावे. ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करावा. भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र अर्पण करावे. हनुमानासमोर दिवा लावून हनुमान चालीसाचे पाठ करावेत.

ग्रह वक्री होण्याचा अर्थ 

ज्योतिषमध्ये ग्रहांच्या दोन स्थिती सांगण्यात आल्या आहेत. एक मार्गी आणि दुसरी वक्री स्थिती. मार्गीमध्ये ग्रह सरळ चालतो म्हणजे पुढे जातो. वक्री स्थितीमध्ये ग्रह तिरका किंवा उलटा म्हणजे मागे वळून चालतो.

बातम्या आणखी आहेत...