आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ संयोग:प्रीती आणि सौम्य योगात साजरी साजरी होईल शनिश्चरी अमावस्या, त्रिग्रही योगामुळे स्नान-दानाचे मिळेल तिप्पट पुण्य

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

30 एप्रिल रोजी शनिश्चरी अमावस्या आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे. चैत्र महिन्यात शनिवारी अमावस्येचा योग क्वचितच येतो. म्हणूनच याला शास्त्रात महापर्व असेही सांगण्यात आले आहे. या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. यासोबतच मेष राशीत तीन ग्रहांची युती होऊन त्यावर शनीची दृष्टी राहील. त्याचबरोबर अमावास्या प्रीती आणि सौम्य नावाच्या शुभ योगात साजरी होणार आहे. यामुळे या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे तिप्पट पुण्य प्राप्त होते.

चैत्र मासातील शनी अमावस्येचा शुभ संयोग
चैत्र महिन्यात तीर्थस्नान आणि दान केल्याने भरपूर पुण्य प्राप्त होते, असे पुराणात सांगितले आहे. त्याचबरोबर शनी अमावस्येबद्दल असे सांगण्यात आले आहे की, या दिवशी केलेल्या दानामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतात. त्यामुळे चैत्र महिन्यात येणाऱ्या या शनिश्चरी अमावस्येला तीर्थस्नान, अन्न, वस्त्र, पाणी दान केल्याने महायज्ञ करण्यासारखेच पुण्य प्राप्त होते. या दिवशी मिळालेले पुण्य दीर्घकाळ लाभदायक राहते.

त्रिग्रही योग आणि शुभ ग्रह स्थिती
सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी, जम्मूचे ज्योतिषाचार्य डॉ. नवीन तिवारी सांगतात की, या दिवशी मेष राशीमध्ये सूर्य, चंद्र आणि राहूची युती तयार होत आहे. या ग्रहांच्या युतीवर शनीची दृष्टी असेल. सूर्य उच्च असेल आणि शनि स्वतःच्या राशीत असेल. त्याचबरोबर या दिवशी प्रीती आणि सौम्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. तसेच सर्व ग्रह 4 राशींमध्ये असल्यामुळे केदार नावाचा योग तयार होईल. त्यामुळे या दिवशी तीर्थस्नान करून दान केल्याने मिळणारे पुण्य अधिक वाढते. श्राद्ध केल्याने पितरांची तृप्ती होईल. या दिवशी धार्मिक कर्म केल्याने सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात. या दिवशी अन्न, लोखंड, उडीद, काळे वस्त्र, छत्री, पाणी दान केल्याने शनिदोषाचा अंत होतो.

शनी अमावस्येला सूर्यग्रहण
या आठवड्याच्या शेवटी, शनिवारी अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. हे आंशिक ग्रहण असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा इथे काहीही परिणाम होणार नाही आणि त्याला धार्मिक महत्त्वही राहणार नाही. मात्र या ग्रहणाचा भौगोलिक परिणाम नक्कीच दिसून येईल. डॉ.तिवारी यांच्यानुसार यामुळे सागरी अपघात वाढण्याची शक्यता आहे. देशात मुसळधार पाऊस आणि गारपीटही होण्याची शक्यता. समुद्र किंवा नद्यांच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता. भारत वगळता ज्या देशांमध्ये ग्रहण दिसणार आहे, तिथे शीतयुद्ध आणि तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...