आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 1 नोव्हेंबर रोजी भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
आज एखाद्या छंदातूनही तुम्हाला चांगली कमाई होईल. पैशाची अडचण दूर होईल.जोडीदाराचे मन जिंकाल.

वृषभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
व्यवसायातील अनेक अडचणींवर मात करूनही तुमच्या यशाची कमान चढतीच राहील. खर्च कमी करून योग्य गुंतवणुकीस प्राधान्य द्याल.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
आज तुमचा कामाचा उरक चांगला राहील. जे मनी योजाल ते तडीस न्याल. इतरांसही कामात मदत कराल.गृहिणी कौटुंबिक प्रश्न सामंजस्याने सोडवतील.

कर्क : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ७
नोकरदारांना वरिष्ठांकडून सन्मानाची वागणूक मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. व्यस्त दिवस.

सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
मनसोक्त खर्च केलात तरी पैशाची कमतरता भासणार नाही. आज दैव तुमच्या बाजूने. प्रयत्नास यश.

कन्या : शुभ रंग : राखाडी|अंक : ४
कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज वेट अँड वॉचचे धोरण ठेवा. कंटाळवाणा दिवस.

तूळ : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ५
भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देऊनच काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांस यश सोपे नाही.

धनु : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : १
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. आज गरजूंना मदत कराल.

मकर : शुभ रंग : क्रिम|अंक : २
आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित कराल. गृहिणींना आज गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.

कुंभ : शुभ रंग : मरून|अंक : ६
काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.श्वसनाचे विकार असतील तर विशेष काळजी घ्या.

मीन : शुभ रंग : मोतिया|अंक : ३
तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. व्यवसायवृद्धी होईल.