आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 10 जानेवारी रोजी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. रविवारच्या या अशुभ योगामुळे 6 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : तांबडा| अंक : ५
दिवस कंटाळवाणा जाईल. मोफत सल्लागार मंडळी बोअर करतील. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
व्यावसायिक ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत मेहनती शिवाय दुसरा पर्याय नाही. संध्याकाळी लवकर घरी जा. पत्नी आतुरतेने वाट पाहत असेल.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : १
ज्येष्ठ मंडळींनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी फक्त मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ७
नवीन नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी येतील. रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळेल.

सिंह : शुभ रंग : पिस्ता|अंक : ९
शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ८
ऑफिस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे. कदाचित वाहन रस्त्यात रुसून बसेल.

तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मन:स्थितीही चांगली राहील.

वृश्चिक : शुभ रंग : क्रीम| अंक : २
आज तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.

धनु : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
बचतीचा विचार आज तरी सोडूनच द्या. घरातील थोर मंडळी आपलेच खरे करतील. कमीच बोला.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४
काही अपुरे व्यवहार पूर्ण होतील. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील.

कुंभ : शुभ रंग : सोनेरी| अंक : १
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. आज कर्तव्यास प्राधान्य द्याल.

मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ५
नोकरी धंद्यात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...