आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक
 • दोन शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

रविवार 10 मे रोजी मूळ नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा आणि सिद्ध नावाचे 2 शुभ तयार करत आहे. या 2 शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

 • मेष: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५

व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. प्रामाणिक प्रयत्नास यश निश्चित.

 • वृषभ: शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९

कामाचा व्याप, अति महत्त्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. आज ऐकण्याचे काम करा.

 • मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

वैवाहिक जीवनात असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. व्यवसायाच्या ठिकाणी भागीदारांशी सलोखा राहील. आनंदी दिवस.

 • कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : १

व्यावसायिक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. अर्धवट उपक्रम नव्यानेे सुरू करता येतील. आज वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.

 • सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : ९

पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कर्तृत्वाचाही प्रभाव पडेल. काही योग्य माणसे संपर्कात येतील. रुग्णांची प्रकृती सुधारेल.

 • कन्या : शुभ रंग : क्रीम | अंक : ७

अथक परिश्रमांच्या साहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. काही महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.

 • तूळ : शुभ रंग : निळा| अंक : २

आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक बघायला हवी.

 • वृश्चिक : शुभ रंग : मोतिया| अंक : ६

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. गृहिणी जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.

 • धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ५

आज घराबाहेर रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अति स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. गुपिते उघड होतील.

 • मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४

हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. ज्येष्ठांना डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत.

 • कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : १

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस.

 • मीन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३

तुमचा कामातील उत्साह पाहून इतरांना प्रेरणा देईल. नोकरदारांना आज वरिष्ठांचे मूड सांभाळावेे लागतील.आज तुम्ही कार्यक्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल.

बातम्या आणखी आहेत...