आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 11 एप्रिल रोजी उत्तर भाद्रपद नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
आपल्या स्वार्थाकडे लक्ष असू द्या. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक तपासा. मोठे आर्थिक व्यवहार टाळा.

वृषभ : शुभ रंग : मरून| अंक : ५
आत्मविश्वासाने नव्या योजना राबवता येतील. पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील.नवीन लघुउद्योजकांचे कर्जप्रस्ताव मंजूर होतील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्याच दिशेने चालू राहील. अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य राहील.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घ्यायची तयारी ठेवा.

सिंह : शुभ रंग : चंदेरी| अंक : २
आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज आहे. वाहन काळजीपूर्वक चालवा.

कन्या : शुभ रंग : पांढरा| अंक : १
हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करून लवकर घर गाठाल. चंगळवादी वृत्ती राहील.आज दोघात तिसरा नको.

तूळ : शुभ रंग : नारिंगी|अंक : ६
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट कराल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नास यश निश्चित.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी|अंक : ८
नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. काही गुपिते उघड होतील.

धनू : शुभ रंग : निळा| अंक : ९
आज अथक परिश्रमांच्या साहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. योग्य माणसे संपर्कात येतील.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
नकळत झालेल्या चुकीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील.

कुंभ : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.

मीन : शुभ रंग : क्रीम|अंक : ९
आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य द्या.

बातम्या आणखी आहेत...