आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 12 डिसेंबर रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : जांभळा| अंक : १
पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. अधिकारांचा गैरवापर टाळावा. घराबाहेर क्रोधावर लगाम हवा.

वृषभ : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
कौटुंबिक सदस्यांमधे सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आज दिवस योग्य.

मिथुन : शुभ रंग : लाल| अंक : ६
आज नोकरीच्या ठीकाणी वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्याल.

कर्क : शुभ रंग : चंदेरी| अंक : ९
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. आज प्रतिष्ठेस जपा.

कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
दुकनातील गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. छान दिवस.

तूळ : शुभ रंग : केशरी| अंक : ६
काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. विरोधकांशी गोड बोलून स्वार्थ साधा.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
उच्चशिक्षित तरूणांच्या अपेक्षा वाढतील. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. कलाकारांना ग्लॅमर मिळेल

धनु : शुभ रंग : मोरपीशी| अंक : ४
कौटुंबिक जिवन समाधानी असेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागतील. आज प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील.

मकर : शुभ रंग : मोतिया| अंक : १
आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. बेरोजगारांना रोजगार मिळेल.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : २
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल. नोकरीच्या ठीकाणी बढतीची चाहूल लागेल. आशादायी दिवस.

मीन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे.

बातम्या आणखी आहेत...