आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवार 12 जून रोजी विशाखा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...
मेष : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
आज तुमच्या मनात काही नकारात्मक विचार येतील. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.
वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : २
कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. आज मुले अज्ञेत राहतील.
मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. पत्नीचे मूड सांभाळावे लागतील.
कर्क : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता भासणार नाही.
सिंह : शुभ रंग : तांबडा| अंक : ३
प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. गृहीणींनी झाकली मुठ झाकलीच ठेवणे हिताचे. कायद्यात रहा.
कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. आज दुपरानंतर प्रवासास निघाल.
तूळ : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या सहवासात रहाल.
वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
आपले म्हणणे इतरांना पटवून देऊ शकाल. आज कुठेही तुमची मर्जी चालेल. हरवलेले गवसू शकेल.
धनु : शुभ रंग : क्रिम| अंक : ६
महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.
मकर : शुभ रंग : निळा| अंक : ८
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.
कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
आज नोकरीधंद्यात अत्यंत उत्साही वातावरण राहील. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. सुवार्ता येतील.
मीन : शुभ रंग : हिरवा| अंक : ९
दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.