आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 12 सप्टेंबर रोजी विशाखा नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या लोकांना वाद आणि व्यर्थ खरचला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : केशरी | अंक : २
शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. आज तुमचा ईच्छापूर्तीचा दिवस.

वृषभ: शुभ रंग : आकाशी | अंक : ६
महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. महत्वाची मेल्स येतील.

मिथुन : शुभ रंग : मरून | अंक : ८
तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. अत्यंत अनुकूल दिवस.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७
प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल. शेजारी सलोखा राहील.

सिंह : शुभ रंग : भगवा | अंक : ६
लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. कौटुंबिक वाद असतील तर सुसंवादाने मिटू शकतील.

कन्या : शुभ रंग : लाल | अंक : ९
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील.

तूळ : शुभ रंग : हिरवा | अंक : ४
आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास करून चालणार नाही. विरोधकांना चहा पाजून स्वार्थ साधावा.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील.

धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : ५
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. पत्नीचे मूड सांभाळावे लागतील.

मकर : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : १.
दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.

मीन : शुभ रंग : निळा | अंक : ३.
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. वरीष्ठांची मर्जी सांभाळाल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

बातम्या आणखी आहेत...