आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 13 डिसेंबर रोजी अनुराधा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सुकर्मा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार...

मेष : शुभ रंग : सोनेरी| अंक : ८
आज काही गोडबोली माणसे भेटतील. देण्या-घेण्याच्या व्यवहारात सतर्क राहा. प्रलोभनांना अजिबात भुलू नका.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. आज सभासंमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन : शुभ रंग : चंदेरी| अंक : ९
आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरिष्ठांचे समाधान अशक्य.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ७
आज तुम्ही कर्तव्यापेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल. बऱ्याच दिवसांनी जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९
आज कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल, पण भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकू शकतील.

कन्या : शुभ रंग : मरून| अंक : ६
काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. काही मतभेद होऊ शकतील. मानसिक संतुलन ढळू देऊ नका.

तूळ : शुभ रंग : निळा|अंक : ८
वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजाऱ्यांशी काही मतभेद संभवतात. आज गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्या.

वृश्चिक : शुभ रंग : क्रीम|अंक : ५
अति धावपळ टाळा. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील.

धनु : शुभ रंग : राखाडी| अंक : १
कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात राहा.

मकर : शुभ रंग : मोरपंखी|अंक :
२ वास्तू खरेदीसठी कर्ज मंजूर होईल. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. अाज म्हणाल ती पूर्व.

कुंभ : शुभ रंग : मोतिया|अंक : ३
व्यावासायिक नवे करार यशस्वी होतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल. प्रकृती उत्तम साथ देईल.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
नोकरीत आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठांना काही विनंती करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser